कविता गजलं... तुझीच
कविता गजलं... तुझीच
राग अबोला अन् दुरावा तुझा
सांग ना कसा तो सहन करावा
तुझ्यावाचून मी ही इथे झुरावे
तुला कसा हा विश्वास मी द्यावा
देतोस तुझ्या आसवांचा पुरावा
जरा बघ ना माझ्या ही सागरा
थोपवले आहे सारेच किनारी
एकदा येऊन डोळ्यांत बघ ना
थांबली आहे वळणावर कविता
जगेल ती थोडी तिला तू भेटता
ये ना परत जगू ती रात्र कवितेची
ऐकव गजल ती राहिलेल्या श्वासा

