नातं
नातं
नाते नसावे थोड्या दिवसांचे
असावे किमान ह्या जन्माचे
नात्याला काही नाव नसावे
नसावीत कुठलीच कोंदणे
असेल प्रेम अढळ विश्वासाचे
नाते समजून सांभाळण्याचे
बिघडलेल्या गोष्टीत साथ देणारे
तरीही त्यावर हक्क न सांगणारे
हे नाते नसावे थोड्या दिवसांचे
मी तुला आणि तू मला जपणारे

