यारी दोस्ती
यारी दोस्ती
आहे हे दुःख खूप जरी
बोलणे हे अवघड तरी
सोबतीला असावं असं कुणीतरी
जो देईल माझ्या मनाला ऊभारी
बसली असता मी अशी एकटी
एकांताच्या निराशेच्या वाटेवरती
इतक्यात एक हास्याची लहर ऊठली
त्यांनी माझी नजर वेधून घेतली
डोलत गेले मी त्या लहरी वरूनी
जाऊन पोहोचले मैत्रीच्या किनारी
झाली शांतता मनाच्या वादळाची
सदैव राहो आपली गोडी मैत्रीची
सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणांसाठी
आयुष्याच्या ह्या खडतर वाटेवरती
आता नाही उरली कशाचीही भिती
लाभली अमूल्य भेट आपल्या मैत्रीची
लाभली अमूल्य भेट आपल्या मैत्रीची
