STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

4  

Monali Kirane

Tragedy

निसटलेलं बालपण

निसटलेलं बालपण

1 min
236

हरवतंय का बालपण खंडीभर क्लासच्या मा-यात,

आई-वडिलांना पारखं पाळणाघरांच्या वा-यांत.

हल्ली जत्रेत फिरवत नाहीत बाबांचे खांदे,

बागेतले झोपाळे तर दिसायचेही वांदे.

आता आजी देत नाही मायेची दूधगुळ पोळी

बर्गरपिझ्झा खातो आम्ही गायब लिमलेट गोळी.

सगळ्यांच्या समोर आता मोबाईलचे स्क्रीन,

ना लंगडी ना लपंडाव,नुसतेच व्हर्चुअल वीन.

पूर्वापार काळाबरोबर सरायचंच सानपण,

आजमात्र अकालीच हिरावतंय का बालपण?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy