निसर्गराणी
निसर्गराणी
नवरी होऊन धरती माय
नटुन थटून उभी राहे
नेशला मखमली शालु हिरवा
चहूकडे शीतल वाऱ्याचा गारवा
रातराणी, चमेली, मोगरा, जाई
फुलांचा हार घेऊनी येई
गुलाब चाफ्याचा होता मळा
अंगणात पसरला पारीजातकाचा सळा
झाडेझुडपे देत होती मधुगंध
चार दिशांना पसरला सुगंध
आकाश नवरदेव बनुनी आला
ढगांनी गळगळात स्वागत केला
नभात होता विजांचा लखलखाट
खाली पाखरांची होती चिवचिवाट
बिरजूताई झाली सवासीन
रिमझीम पावसाचा सुरु झाला नाचन
चांदण्याचा बनविला मुकूट
सूर्य चंद्र मानिक मोती त्यात
मैना, कोकिळेच्या गाण्यांचा वेगळाच रंग
मोरमोरनी थुईथुई नाचण्यात दंग
असा मधूमिलनाचा दरबार
आनंदाने नाचू लागला सरोवर