रात्र
रात्र


सूर्य नभ सोडुन गेला
सांजवेळी अंधार झाला
पोटाची खळंगी भराया
पाखरे गेली वनात
रात्रीच्या अंधारात
परतली आपल्या घरटयात
वनातून आली गाय
निहारून बाळा पाहे
नवसूत्र सुटला पान्हा
पाळस गोठ्यात तान्हा
तान्हुल्यास कुरवाळीले
बाळ शांत झोपी गेले
चंद्राचा तो नीलप्रकाश
गंगेनी लुकलुकनारा आकाश
सप्तऋषीनी घातला घेरा
अढळपदी बैसोनी चमकतो ध्रुवतारा
दिवसभरी राबुन आला
तन थकव्यात चुर झाला
रात्रीचा विझला दिवा
जीवा मिळाला विसावा