सत्त्यानाश
सत्त्यानाश
1 min
224
सांगतो रे बाबा जीवनाची कथा
कान देऊनी सर्व जण ऐका।।
लहान भावाचा सांभाळ केला
रामाचा भरत कसा? दूर झाला।।
चोचीत आणून दाणे भरविला घास
उन्हातान्हात फिरुनी काढला उपवास।।
मुलांसाठी देवास नवस वाहिला
सुख संपत्ती कधी ना पाहिला।।
आज्ञाकारी बाळ जन्मला माझा
शब्दात वाहितो अपमानाचा बोझा।।
बालपणापासून राबराब राबले
नाही मी स्वतःस जपले।।
बायको मुले करू लागले तिरस्कार
शरीरात बांधला बिमारीने घर।।
दुसऱ्याच्या भल्यासाठी जीवन तापले
थकत्या वयात सर्व कसे कोपले।।
नाही कुणाचाच प्रेमळ बोल
वाजवी लेकरं संसाराचा ढोल।।
आता शेवटची मागणी मागतो तुला
देवा घेऊन चल आपुल्या गावाला।।
मागील जन्मी काय म्या पाप केला
माझ्या जीवनाचा सत्यानाश झाला।।