STORYMIRROR

premeshwar barsagade

Romance

3  

premeshwar barsagade

Romance

मिलन

मिलन

1 min
353

रात्रंदिवस

धडपडत होतो

तुझ्यासाठी

केव्हा होतील दोन

जीवाच्या भेटीगाठी।।1।।


रस्त्यांना

चालताना इकडे तिकडे

पाहत होतो

तुझ्याचसाठी

रानोवनी धावत होतो।।2।।


सख्ये

कधीतरी जवळ

येशील का?

जीवनाच्या क्षणापर्यंत

साथ देशील का?।।3।।


भगवंताच्या

चरणी ठेऊन

माथा

जुडू दे म्हणत होतो

तुझं माझं नातं।।4।।


चारही

दिशा फिरून थकून

गेलो

निराश होऊन

शेवटी घरास आलो।।5।।


मला 

वाटे कधीच तू

मिळणार नाही

तुझ्याविना जीवन 

कसे उणे राही।।6।।


शेवटी

एक दिवस मला सुंदर

स्वप्न आले

आणि त्यातच दोन

जिवांचे 'मिलन' झाले।।7।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance