STORYMIRROR

premeshwar barsagade

Others

3  

premeshwar barsagade

Others

वेदना

वेदना

1 min
239


मी जन्मतांना

जन्मदात्रीला झाल्या

असहाय वेदना ।।


रांगतांना अळखडुन पडतांना

माय धावत यायची

मला उचलून घ्यायची

तिला होत होत्या वेदना ।।


शाळेत आई धरून नेई

पाठीवरचा बोझ हातात घेई

दारावर उभी राहून वाट बघायची

तिला व्हायच्या वेदना ।।


मला मोठी होताच लग्न केल

दुसऱ्या घरी दिल

जावयाच्या हातातहात देताना

मायबापाला झाल्या वेदना ।।


जेव्हा मला छोटस मूल झाल

अनंदाच्या भरात सगळ सहन केल

तेव्हा कळल्या

असहाय वेदना ।।


Rate this content
Log in