STORYMIRROR

premeshwar barsagade

Children

3  

premeshwar barsagade

Children

बालपण

बालपण

1 min
427

बालवयात खेळले

खेळ होते नानापरी

लहान गोष्टीसाठी होत

होती मित्रात मारामारी ।।१।।


लहानपणाची ती

वेगळीच दुनियादारी

खेळाच्या नावाने होती 

सवगड्यांची तयारी ।।२।।


आकरावरी जमत होता

मुलामुलीचा तो मेळ

दिवसभर चालत होता 

टिप्पल दांडूचा खेळ ।।३।।


आठवते अजुन आंब्याच्या

झाडावरी खेळ खेळतांना

त्या तळ्याच्या निर्मळ

पाण्यात पोहताना ।।४।।


जम्मत मुलांची गुट्टी

शाळेला मारली सुट्टी

खेळ खेळतांना घरात 

बाबा काढायचे वरात ।।५।।


बाबाचे ते रागावणे

वेड्या बहिणीची माया 

माय माझी देत होती 

ती पदराखाली छाया ।।६।।


कधी भेटणार लहान

पणाचे ते जीवन

देवा अजून एकदा

येऊ दे रे बालपण ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children