पंख
पंख


पंखात भरून हवा
मारीण उंच भरारी
जाईन समुद्राच्या
देखण्या किनाऱ्यावरी।।१।।
नभात खेळविता बाळ
नयनांनी बघत होते
च्यारी दिशांना फुलला
तो मनमोहक माळ ।।२।।
चिमणी झाडा शिखरी
बसून घरट्या वरी
पंख पसरोनी देई
बाळा सुखाची सावली।।३।।
बागेत फुलले झेंडू
लटकले लाल चेंडू
त्यावर पंख हलवीत
बसली मैना राणी ।।४।।
काय बा? देवानी पंख
नाही दिलेत मजला
टिपुन आलो असतो
त्या सुंदर चांदणीला ।।५।।
ईश्वरा मला पंख दे
या स्वार्थी जगतातून
जिथे नांदे सुखशांती
त्या निर्जन ठिकाणी ने ।।६।।