जीवन
जीवन
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
सुखमय जीवन
सांभाळून ठेव
नाहीतर आहे
मोठा भेव।।
दिल्लीला भूकंप
तीन-चार वेळा
येऊन गेला
जीवन अस्ताव्यस्त झाला।।
कोरोनाची महामारी
लढता लढता
थकून गेली
जनता सारी।।
टिड्डीने दाखविली
किमया भारी
खाऊन बसली पिकं सारी
गेली शेतकऱ्यांची शिदोरी।।
शुरविराप्रमाणे आला
तो बघा वादळवारा
झाडंझुडपे पाडून
घराचे सप्पर घेऊन गेला।।
डोळ्यातील आसवे
पुसता पुसता
कंठ दाटून आला
समुद्रही सुकून गेला।।
सावध हो नियमाचे
करून घे पालन
वेळोवेळी दक्षता घे
किंमती आहे जीवन।।