Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sudha Patil

Inspirational

3  

Sudha Patil

Inspirational

निसर्गाच पुस्तक एकदा वाचून बघ

निसर्गाच पुस्तक एकदा वाचून बघ

1 min
246


भव्य, अगाध असं निसर्गाचं पुस्तक....

एकदा वाचून बघ.....

लावण्य देखणं, हरित मखमली रुपडं....

आकाशाला अभेद होऊन भिडणं

हे जरा शिकून बघ...

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ.....//१//


इवल्याश्या बीजापासून ते भव्य पर्वतापर्यत.....

कणकण ज्ञानामृताने व्यापलेला आहे...

तो कण अन् कण एकदा

 वेचून बघ...

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ....//२//


अथांग सागर अन् ही गूढरम्य धरणी....

आशयगर्भीत महाकाव्य घेऊन

शतकानुशतके तटस्थ आहे..

त्या शब्दाशब्दातील भाव

एकदा समजून घेऊन बघ

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ.....//३//


चराचरापासून हा महाखंड

सदोदित आपली पानं उघडून

खुणावतो आहे....

आपलं मानवतेचे पाठ नित्य

रचतो आहे....

ते सारे पाठ एकदा वाचून बघ...

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ....//४//


प्रेमाची अक्षरं अन् संस्कारांची वाक्यं....

यांनीचं हे पुस्तक गुंफलेलं आहे

ती सारी शिदोरी एकदा

पदरात घेऊन बघ...

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ.....//५//


आयुष्यभर वाचायचं असतं अन्

स्वत:ला घडवायचं असतं..

हेच तर या उघड मनाच्या

 पुस्तकाचं सांगणं असतं.

एकदा त्याला मनापासून ऐकून बघ....

निसर्गाचं पुस्तक एकदा वाचून बघ....//६//


Rate this content
Log in