STORYMIRROR

Santosh Jadhav

Inspirational

3  

Santosh Jadhav

Inspirational

निसर्ग

निसर्ग

1 min
14K


हिरवळीच्या स्वर्गाचं वेड लागतंच लागतं 

 सावलीचं झाड पाण्यात प्रतिबिंब बघतं

वेल आवळते पाश,झाडाशी घट्ट 

पक्षांच मोहोळ मुक्त सफरीला निघतं 

चिवचिव करत चिमणी स्वतःशीच बोलते 

इवल्याशा चोचीतून पिलास दाणे घालते 

झाड देतो पक्षांना, निवारा निशुल्क 

घरट्यांची वसाहत फांदी फंदीवर झुलते 

उनाड वारा सुटतो फाडत गर्द पाती 

झाड फांद्या मग, नाचत गीत गाती 

नदी वाहे दुथडी घेऊन दगड आणि गोटे 

प्राण्यांची तृष्ण भागवण्या सज्ज पाणवठे

धबधब्यांची पांढरी पिलं आईकडे पळती

उंच उंच माथ्यावरून नदीत दूध गळती 

पांढरी शुभ्र बलाक गर्दी पाण्यात विहार करी

बदललं वातावरण अन् पडल्या पाऊस सरी 

सूर्य डोकावी मधेच अन् मधेच काळी छाया 

निसर्ग फुलण्यास कारण आभाळाची माया 

हिरवा सदरा घालून सृष्टी नटली आसमंती

फुलातला मकरंद चाखण्या भ्रमराची भ्रमंती 

पाऊस मोती पानोपानी प्रभाकर देई झळाळी 

निसर्ग भरतो वारेमाप वसुंधरेची झोळी 

राखूया सगळे मिळून निसर्गाचा समतोल 

नसतील जेव्हा झाडे वेली तेंव्हा कळेल मोल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational