निसर्ग सौंदर्य
निसर्ग सौंदर्य


निसर्ग
मिळालेला खजिना
अलौकिक सुंदर नजारा
ऋण त्याचे सारे जाणा
निसर्ग
शालू हिरवा
ओढी पावसाळी वातावरणात
पसरवी सर्वत्र थंड गारवा
निसर्ग
चांदण्यांचा देखावा
करी मंत्रमुग्ध मनाला
जपावा हा अनमोल ठेवा
निसर्ग
घेता रौद्ररूप
सारे संपून जाई
नुकसान हानी होई खूप