निसर्ग माझा सखा
निसर्ग माझा सखा
*निसर्ग माझा सखा*
*निसर्ग माझा सोबती*
*अत्यावश्यक सर्व बाबी*
*निसर्गाकडून मिळती.....१*
*फळे फुले,पाने मिळती*
*अविरत आणि सतत*
*काळजी घेतात आरोग्याची*
*वनौषधीचा पुरवठा करत.....२*
*प्राणवायू पुरवून करतात*
*जगण्यासाठी उपकार*
*भूतलावर घटक निसर्गाचे* *
*अनंतानंतरूपी प्रकार.....३*
*निसर्ग घेतो काळजी माझी*
*निरनिराळ्या ऋतूमध्ये*
*काळजी घेणाऱ्या निसर्गावर*
*करतो निस्सिम प्रेम आयुष्यामध्ये.....४*
*करून वृक्षलागवड आज*
*निर्धाराने जतन करू*
*संरक्षण पर्यावरणाचे*
*सदोदित आपण करू.....५*