निसर्ग कविता
निसर्ग कविता
धुंद सारी सृष्टी झाली
जादूकांडी फिरवली,
स्वप्नवत वाटणारी
रूप नवे जणू ल्याली..
मन प्रसन्न होऊनी
हिरवळ धुंद करी,
थेंब टपोरे संगती
आल्या पावसाच्या सरी..
पशु-पक्षी गुंजारती
प्रसन्नता भोवताली,
डोलणारी सृष्टी अशी
गुज खोली मनातली...
सारे क्षण सुखमय
तन-मन सारे वाहू,
अंगोअंगी रोमांचक
साज निसर्गाचा पाहू..
सरीतून हर्षगीत
धुंद होऊन आळवू,
पावसाच्या थेंबातून
स्वप्न यशस्वी साठवू...