STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

... निशाना...

... निशाना...

1 min
348

... निशाना... 


एकेक जखम गेली चिघळत

जेव्हा त्याने धरला निशाना

झाले होते कैक घाव ह्रदयावर

आला विस्मृतीत गेलेल्या 

गोष्टींना उन्माळा...


ज्या टाळल्या होत्या गोष्टी

त्या समोर येऊन पून्हा ठाकल्या

जीवनाची राखरांगोळी करणाऱ्या

प्रेमाला कोसत राहिल्या...


प्रेमात दिला धोका तिने 

 तिच्या आठवणीत 

तडफडत राहिला 

झाला होता वेडापिसा तिच्यासाठी 

विरहात तिच्या कुढत राहिला... 


उडाला त्याचा पूर्ण विश्वास 

प्रेम नावाच्या शब्दावरून 

विलापात कंठत होता दिवस

प्रणयात झालेल्या फसवणूकीवरून... 


निशाना साधत होता आता 

एकेक प्रेमातल्या आठवणींवर 

करत होता सर्वनाश तीर घालून 

मनावर प्रतिबिंबित झालेल्या स्वप्नांवर... 


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Inspirational