निशाचर
निशाचर
काळोख रात्री
जंगल जागतो
पिशाच्चाच्या संग
निशाचर फिरतो
निशाचर फिरतो
करुन अंधारला मित्र
रात्री काळोखाला
बनवून छत्र
दिवसाचा वेध
रात्रीला घेतो
काळोख छायेत
दिवसाला नेतो
निशाचर घुबड
काळाचा संदेश
वर्तमानाला देतो
भविष्याचे आदेश
अरे लख्ख प्रकाशा
दिपवून डोळा
काळोख पसरवितो
दिवसा ढवळा
निशाचराचा संदेश
दिवस असो रात्र
कर्म कर्तुत्व करा
घेऊन चांगुलपणाचे अस्त्र
