निरोप
निरोप


निरोप घेणं तसं अवघडच
पण तेही तिने शिकवलं.
निरोपातही असतं प्रेम
आज मला जाणवलं.
जाता जाता ती खात्रीने म्हणाली
भेटेल रे लवकरच.
धडधड होतीये मनाची आणि
भीती सुद्धा आहे खुपच.
एक मन म्हणतंय
तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो आहे.
दुसऱ्या मनाची रुखरुख
श्वास ही अचानक वाढतो आहे.
शेवटी दोन्ही मनांची सांगड
आता मी घातली आहे.
बाय म्हटलोय खरा पण
डोळ्यात या तिच्याच येण्याची वाट साचली आहे.