STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

निरोप लाडक्या बाप्पाला

निरोप लाडक्या बाप्पाला

1 min
271

देता निरोप आज बाप्पाला 

मन भरूनीया आले देवा

तुझ्या आशिर्वादाचा दरवळ 

 नित्य जीवनी घडो तुझी सेवा


    तुझ्या आगमनाचा सोहळा

   झांज-ढोल-ताशांच्या गजरात

    मिरवणुकीत उधळूनी गुलाल

   मोदक नैवेद्य पूजा-अर्चा दिनरात


घरोघरी भक्तीचा जागर

सान-थोर आनंदाने गाती

बाप्पाच्या भक्तीच्या सोहळ्यात

नाहली मना-मनाची सारी नाती


     दुर्वांकुर,लाल फुलांचे हे हार

     शोभे गजवदना गणराया

     आंबा पानाचे तोरण दारी

     सडा-संमार्जन रांगोळ्या काढाया


नयनी साठले मोहक रूप 

आज भाव भक्तीत नाहला

देवा तुझ्या दर्शनमात्रे प्रार्थना

अवतार सगुण रूपात पाहला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy