STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

निर्भय बाळ

निर्भय बाळ

1 min
462

लहानपणी बागुलबुवाची भिती

आई बाळाला हळू समजाविती

बाळ मुकाटपणे झोपी जातं

आईच्या मनात द्वंद्व सुरु होतं


बाळ माझं धीट असावं

कुठलही भय मनात नसावं

मनातला बागुलबुवा काढून टाकते

निरोगी धीट बाळाला बनवते


अंधाराची , बागुलबुवाची

बोकाडीची , मनी भूभूची

नको कोणतीच भिती

शांतता असावी चित्ती


निर्भय बाळ निरोगी असते

मन सदैव आनंदी आसते

अशीच बाळे धीट सैनिक होतात

सीमेवर देशाचे रक्षण करतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract