STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

4  

गोविंद ठोंबरे

Inspirational

निराशा

निराशा

1 min
526

मनाच्या तळाशी नसावी निराशा

जरा खोल ती ओघळावी निराशा


तुझा देव आई...मला दान मागे

मला देवळाची...कळावी निराशा !


तुला जिंकणे आज सोपे नसावे

मला आज ती... का छळावी निराशा ?


फुटे आसवांचे एकांती किनारे

तुझ्या अंगणाशी पुरावी निराशा


भले कोण होते, बुरे कोण आहे?

जगालाच साऱ्या भुलावी निराशा 


उभा काल होतो जरा धाडसाने

मला आज ती, घाबरावी निराशा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational