निळी नवलाई
निळी नवलाई
आकाशाची निळी नवलाई ढगांत सामावते ...
वाऱ्यावर स्वार होऊन पळू लागते,
आकाशी पांढऱ्या रंगात वेगवेगळे आकार धारण करते ,
संध्याकाळी लाल केशरी रंगात न्हाउन निघते ,
सुर्यासोबत लपाछपी खेळु लागते,
त्याच्यावर राज्य आल्यावर
अंधाराशी दोस्ती करते ...
चांदण्यांची दुलई पांघरून चंद्राच्या गोष्टीत रमते
गोष्टी मग स्वप्नांच्या जगात घेउन जातात ...
पीसासारख्या मनात,
रंगबिरंगी स्वच्छंदी फुलपाखरं रुंजी घालू लागतात ,
शिंपल्यातल्या मोत्यांचे तुषार होउन ऊडू लागतात ,
वाऱ्याची झुळूक हळूच सूर्याला हलवते,
जागा झालेला सूर्य पेंगुळलेल्या ढगांना बाजूला सारतो,
ढग मग किरणांवर स्वार होउन इतस्ततः पुनः पळू लागतात ...
इतस्ततः पुनः पळू लागतात ...
