निळा चहा
निळा चहा
चहा चहा
दुधाचा चहा
बिन दुधाचा चहा
गुळाचा चहा
साखरेचा चहा
मसाला चहा
अद्रकाचा चहा
विविध पदार्थ टाकताच
मिळतात विविध नावे चहाला!
चहावाले लावतात आपले आडनावे
मग बनतो तो अमृततूल्य चहा!
ग्रीन टी
लेमन टी
रोझ टी
ब्लॅक टी
काय ती इंग्रजी नावे
रोजच्या चहाची तल्लफ नाही भागत ह्या टीने!
निळा चहाची पाटी वाचली
निळाई अनुभवु म्हणून ऑर्डर केला चहा!
रंग त्याचा मनाला भावला
चवीने मन केले जरा खट्टू!
किंमत तर काय गगनाला भिडलेली
आयुर्वेदात सांगितले आरोग्यदायी फायदे!
म्हणून चवीने घेतला एक एक घोट निळ्या चहाचा!
किंमती कडे केला कानाडोळा
जिभेचे चोचले ठेवले थोड्यावेळ बाजूला
आरोग्याला मान देत केला तो आपलासा आता!
