नेता कसा असावा?
नेता कसा असावा?
नेता हा ध्येयवेडा असावा परंतु तो केवळ स्वप्नाळू नसावा जनतेला भव्य दिव्य स्वप्न त्याने जरूर दाखवावीत पण
तो स्वप्नात रममाण होणारा नसावा, वास्तवाचे त्याला भान असावे
गिधाडांप्रमाणे लचके तोडन्यास टपलेल्यासाठी तो ठरावा कर्दनकाळ
नेता नसावा स्वार्थी ,संधीसाधू , गटबदलू छल कपटी पाताळयंत्री
त्याने अंगीकारावे सदैव न्याय , स्वातंत्र्य , समता बंधुता
त्याने व्हावे लोकशाहीचा सच्चा शिपाई , लढावी सच्ची लढाई
त्याने द्यावी हमी अन्न , वस्त्र ,निवारा सुकर जगण्याची
नेता असावा दूरदर्शी सदोदित कर्तव्यतत्पर तितकाच संवेदनशील
त्याने गावे सर्वांगसुंदर मांगल्याचे , मानवतेचे गाणे सदोदित
त्याने व्हावे पद दलितांचे वंचितांचे तारणहार , भाग्यविधाता
सविनय मार्गाने चालविणाऱ्या चळवळीसाठी कायम दिशादर्शी
