नदीमाय
नदीमाय
नदीमाय ही माझी,
भरभरून प्रेम देते.
तिच्या कुशीत गेलेल्याचा,
संसार फुलविण्यास बळ देते.
कुणी वेचली नदीत मासे,
कुणी मोती, कमळे.
ती फक्त देत राहिली,
पाहत घेण्या-याचे सोहाळे.
नदिच देते कित्येकांस जीवदान.
त्याचे नाही कुणी ठेवले भान.
क्रुर नर करती तिला प्रदूषित,
होतोय तो नाशास कारणीभूत.
जाणतात सारे नदीची महती.
आता तरी करू या जन जागृती.
तिच्या रक्षणास कंबर कसू,
पुढील पिढी बघा लागेल हसू.
