STORYMIRROR

Om Jayesh Gujarathi

Abstract Others

3  

Om Jayesh Gujarathi

Abstract Others

नदीकाठची रात्र

नदीकाठची रात्र

1 min
192

नदीकाठची रात्र ही बोलकी असते 

नदीची लाट ही अनोळखी असते ;

ही अनुभूती मनाला घ्यावीशी वाटते

नदीकाठची रात्र ही हवी हवीशी वाटते .....


मनभावी असा सुवास सभोवती दरवळत असतो 

तो ही संगतीला बोलवत असतो ;

आकाशात चांदणी ही चमकत असते 

नदीकाठची रात्र ही हवी हवीशी वाटते ...


पौर्णिमेचा चंद्र बघण्यास नयनी सुख भेटते

टूटलेला तारा पाहून इच्छा मागावीशी वाटते ;

कधी शांत तर बोलके सौंदर्य बघण्यास 

नदीकाठची रात्र ही हवी हवीशी वाटते .....


नदीकाठी थंड हवा सुटलेली असते 

नदीची लाट ही वाहत असते ;

चंद्राचे प्रतिबिंब नदीवर जे पड़ते 

नदीकाठची रात्र ही हवी हवीशी वाटते ......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract