काही बोलायचे आहे
काही बोलायचे आहे
काही बोलायचे आहे पण विषय नाही,
विषय आहे तर बोलायचे मन नाही
कटू आहे पण सत्य आहे
कोणाकडेच बोलायला विषय नाही
विषय भेटला तर वेळ नाही
वेळ काढावी म्हटली तर मनापासून कोणालाच इच्छा नाही
इच्छा कमीशी झाली
बोलण्याचा गोडवा नाहिसा झाला
एकत्र बसून बोलने हा जसा इतिहास झाला
शब्दांचे चयन जसे कमी झाले
लोकांचे मन दुरावेचे झाले
नाते नाजूक धागे सारखें झाले
धागे जोडणे अवघडच झाले
काहीच पर्याय नाही म्हणून बोलत आहे
थोड़ा वेळ लावून बोलणे हे
म्हणजे व्यस्त आहे असे समजने योग्य आहे
प्रातमिक्ता हे व्यक्ती वर अवलंबून आहे...
आजकल बोलणे हे अवघडच आहे
काही बोलायचे आहे.... काही बोलायचे आहे....
