नववर्ष आगमन
नववर्ष आगमन
1 min
184
जुन्या आठवणी ठेऊनी मनात
नवे आठवणी बनवूया,
चला सारे नववर्षाचे जल्लोषात स्वागत करुया....
विसरुनी सारे दु:ख
नव वर्षाच्या गाडीचे करुया तिकिट बुक
अनुभव करूया नवे क्षण सुखाचे
चला सारे करुया वेलकम नववर्षाचे...
करुया चांगले कामे व दानधर्म
सोडूनी सर्व वाईट विचार व कर्म
जमा करू नवी उर्जा, उल्लास व ताकत
२०२४ या वर्षाचे सारे मिळूनी करुया सुस्वागत सुस्वागत ....
