नभ येईल भरून...
नभ येईल भरून...
जेव्हा तू नाही घेत मला समजून.
माझ्याही काही आवडी-निवडी,छंद
असू शकतात हे पण तू का
बरं जातोस पार विसरून.
मी तर तुझं काहीचं विसरत नाही,
तुला नेहमी जे आवडत तेच करते.
पण तू का असा विक्षिप्त वागतोस...?
जणू काही तू मला नव्यानेच ओळखतोस.
मन होतं ना खुप हळवं जेव्हा;
तेव्हा......ना
आपसूक नयनांमधे नभ येतात रे भरून.
सांग ना रे मी तुझी कशी करू जपवणूक....
तन-मन जातंय माझं थरथरून.....
नभ येईल भरून......
