नभ रंगवेडे
नभ रंगवेडे
शांत *नील* अंबरात
काय वसे अंतरात?
नसे कधीच निवांत
नित हसते मनात (१)
रम्य पहाटे उषेची
गोड *लाली* नभांतरी
जादू सारी निसर्गाची
जादूगार अधांतरी (२)
रश्मी किरण *सोनेरी*
तन मनास सुखवी
उषःप्रभेसवे येती
मनी चैतन्य फुलवी (३)
दाटे *कृष्ण* घनमाला
*नीलवर्ण* मोर नृत्य
घन मालांचे नर्तन
हसे वसुंधरा नित्य (४)
रंग *केशरी* संध्येला
बिंब खुलवी अर्णवा
नभी रंग उधळण
नित्य सुखवी लोचना (५)