नाविन्य...
नाविन्य...
रुळलेल्या वाटेवरून,गर्दीत पावलं हरवतात,
नाविन्याचा रस्ता करून,माणसं पाऊल उमटवतात
जिंकायचं असेल तर, अनुकरण करू नका,
नाविन्याच्या वाटेवरून, चालण्यास थकू नका
स्वतंत्रपणे,कल्पकतेने, नवे मार्ग शोधा,
तेच मानवतेचे मार्गदर्शक,नवी पद्धत खोदा
जे करतात नाविन्याचा प्रवास,ते चिरंजीव होतात,
अनुकरणप्रिय माणसं,कायम खुजीच राहतात
