नाव
नाव
मी ही नाव माझे बदलून पहावे म्हणतो
नशीब थोडेसे, आजमावून बघावे म्हणतो
काय काय नाव ठेवावे माझा मलाच प्रश्न
वाटते जे ते आधी लिहून ठेवावे म्हणतो
प्रसवलेली नावे, ती ऊधळलेली दूर अंबरात
त्यांचे ठाव ठिकाणे शोधून काढावे म्हणतो
लोकांच्या संग्रही ती काही गहाळ झालेली
नावे सापडेली, चाचपून निघावे म्हणतो
हव्यास हा म्हणावा का नूसताच ऊपद्व्याप
लोकप्रेम नावे, मी ओरबाडून घ्यावे म्हणतो
कोणाचे अडले ईथे, पडले का सडले ते शाप
गुन्ह्यांचे ही मी, घ्यावे लपवून सुगावे म्हणतो
नावाचे काय आहे, अजूनी पेटायची आग आहे
तोवरी मीही थोडेसे पसरून निजावे म्हणतो
