STORYMIRROR

Ayush Homeopathy

Tragedy

3  

Ayush Homeopathy

Tragedy

नाती

नाती

1 min
141

सांज-सकाळी, दुपारच्या वेळी

घर हे माझं गजबजलेलं

काळोखात मी दीप शोधतो

मी माझी नाती गुंफतो


आई बाबांचा काळ वेगळा

प्रेम वेगळे, धाक वेगळा

आज मी त्यांची सावली शोधतो

मी माझी नाती गुंफतो


असुन नसलेली ही नाती

वाऱ्यानेही कोसळणारी

मी दोऱ्यात मनी वोवतो 

मी माझी नाती गुंफतो 


कोऱ्या त्या पानावरती

मी पुसलेल्या रेषा शोधतो

नकळत तुटून गेलेली नाती

मी माझी नाती गुंफतो


विखुरलेली मने ही सारी

विस्कटलेली, भरकटलेली

मी त्यांना साद घालतो

मी माझी नाती गुंफतो


छाटलेले पंख जणू हे

कळत नकळत तुटून गेले

मी ती दुःखरी लस फुंकतो

मी माझी नाती गुंफतो.


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy