STORYMIRROR

Ayush Homeopathy

Tragedy Classics

3  

Ayush Homeopathy

Tragedy Classics

तिलांजली

तिलांजली

1 min
3

धगधगत्या निखाऱ्याला

विझवायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो 


राखाळलेली स्वप्न ही

मंतरलेली रात्र ती

मी निजवायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो


काहुर माजवून गेली ती

स्पंदने ही धकधकणारी

शेकोटी पेटवुन गेली ती

तिची ही धिटाई

हरवायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो


लखलखत्या उन्हात

गारवा शोधायला निघालो

ढेगाळलेली धरती ही

मी तिला नांगरायला लागलो

आता मी तिला

विसरायला निघालो


काळवंडलेलं आयुष्य माझं

मी ज्योत पेटवायला निघालो

तिच्यासाठी व्याकुळ मन हे माझं

मी रमवायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो


न जाणते पणी भुललो मी

तिच्या आठवणीत

किती रडलो मी

फिसकटलेलं आयुष्य माझं

रुळावर आणायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो


नटरंगी नार ती

नखऱ्यानीं तिच्या

झालो घायाळ मी

मी तिची सावली

पुसायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो


अर्धवट राहिलेली स्वप्ने

तिनं दिलेली वचने

सारं सारं काही मी

फुंकायला निघालो

मी तिच्या नावाला अखेरीस

तिलांजली द्यायला निघालो

आता मी तिला

विसरायला निघालो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy