STORYMIRROR

Ayush Homeopathy

Tragedy

3  

Ayush Homeopathy

Tragedy

चिमुकलेे पाऊल

चिमुकलेे पाऊल

1 min
22

चिमुकलेे पाऊल तिचे

माझ्या अंगणी पडले

सप्तसुर जणु हे

माझ्या मनी उमटले


घेऊन आली ती

एक अनोखी माया

आजवर जी कधीही

अनुभवली नव्हती


लेकीचे असते प्रेम वेगळे

भरलेले रांजण जणु हे

कधी न सुकते

कधी न थकते


अलगद कधी मांडीवर येऊन बसते

तर कधी पप्पा -पप्पाचा जप करत राहते

बाहेर जाताना पायाला येऊन चिकटते

तर कधी हात हलवून टाटा टाटा करते


घर पुरत नाही तिला मिरवायला

कष्ट वाटत नाही हौस तिची पुरवायला

वाटेल ते करण्याची उर्मी येते

हट्ट तिचा पुरा करायला 


डोळ्यात तिच्या असते फक्त माया

बापाची असते ती छाया

सोडुनी कधी जाईल ती

विचाराने या‌ धगधगती माझी काया


काळीज जाते हळूहळून

जीव‌ जातो शहारून

आयुष्याची विटंबना ही

लेकीला जावे लागते सोडूनी बापाला.


धुंदीत राहावंसं वाटतं

तिला कुशीत घेऊन झोपावसं वाटतं

सारं काही ठेवून बाजूला

तिला आयुष्यभर जपावंसं वाटतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy