STORYMIRROR

Ayush Homeopathy

Romance Classics

3  

Ayush Homeopathy

Romance Classics

मन हे माझं

मन हे माझं

1 min
2

स्वप्नांच्या मागे एकटंच पळतय

मन हे माझं नुसतंच झुलतय


कुणाच्याही मागे जातंय नटुन

थकतच नाही ते घिरट्या घालुन

पक्षांच्या थव्यासोबत जातय उडुन 

रंगात मेघांच्या ते जातंय रंगुन


सौंदर्य तिचे बघतय चोखुन 

मिठीत तिच्या जातंय निजुन 

चांदण्या रात्री करून आपलसं 

धुंदीत तिच्या जातंय झिंगून 


स्वप्नांच्या मागे एकटंच पळतय

मन हे माझं नुसतंच झुलतय


रात्री बेरात्री बसतंय ऊठुन

नयनात तिच्या जातंय बुडुन

करूनी झालर प्रेमाची

ह्रदयात तिच्या बसतंय रूतुन


कधी धरणी तर कधी आकाशी

कधी हिरवा गार गालिचा

तर कधी ओसाड माळरानी

मन हे माझं क्षणात उडतंय


स्वप्नांच्या मागे एकटंच पळतय

मन हे माझं नुसतंच झुलतय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance