STORYMIRROR

Ayush Homeopathy

Tragedy

3  

Ayush Homeopathy

Tragedy

कोपरी

कोपरी

1 min
6

बापाची ती कोपरी

होती आनंदाची टोकरी

काय पाहिजे ते मागावे

आणि कोपरीतुन त्यांनी

लगेच काढून द्यावे


मागायचे चाराने आठाणे

पण प्रेम मिळायचे लाख मोलाचे

गोळ्या, बिस्किटे, बर्फी

बटर अन् खारी

हौस फिटे पुरी

तरीही होत नव्हती

मोकळी ती कोपरी


संसाराचा डोलारा मोठा

सोसत होता बाप माझा

कधी मोकळी तर कधी भरलेली

कोपरी होती सोबत त्याच्या


अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले

कधी मऊ तर कधी कठीण

दिवस ते सोसाया मिळाले

कधी रिकामी घागर तर

कधी भरलेला सागर

असा हा प्रवास कोपरीचा


आमच्या किती इच्छा

पुर्ण केल्या तिने

आमच्या किती वेदना

घालवल्या तिने

कधी कठोर तर कधी मधुर 

अशी होती बापाची ती कोपरी

होती आनंदाची टोकरी


आज ती कोपरी

आम्ही हरवुन बसलो

आनंदाची ती टोकरी

आम्ही घालवून बसलो

अनेक निखारे सोसुन

ती आता संपुन गेली

आमचं आयुष्य घडवुन

ती आता विझुन गेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy