Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ayush Homeopathy

Romance Classics

3  

Ayush Homeopathy

Romance Classics

कळत नकळत

कळत नकळत

1 min
21


कळत नकळत तिनं मला पाहिलं 

अन् न‌ पाहिल्यासारखं केलं

गालावरची खळी अलगद थोडीशी खुलली

अन् चटकन गंभीर होऊन बसली


पेनाचे टोपन ओठांवरुन फिरु लागले

मधेच दातांनी कुरताडु लागली

नजर होती समोर फळ्याकडे

डोळे तिरकस थोडेसे झुलू लागले


समोर आली अन् खुदकन गालात हसली

लगेच बदलून तोरा निमुटपणे निघुन गेली

पाहिलंच नाही मी तिला एकदा लपून

बसली तेव्हा ती गाल फुगवून


तिचं हे वागणं काही कळेनासे झालंय मला

तिचं हे कोडं काही उलगडणा मला

मनी आहे एक अन् दाखवते एक

भावना त्या आवरनं बरं जमतंय तिला


एकदा पकडलच तिला माझ्याकडे बघताना

कावरी बावरी झाली ती चोरी पकडली गेली

आता काही पर्याय उरला नाही तिला

मान्य करते ती आवडतो मी तिला 


तिच्या मनातलं हे लपलेलं प्रेम

आता कळलयं मला

तिनं टाकलेलं ते कोडं

आत्ता कुठं उलगडलयं मला 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance