STORYMIRROR

Ayush Homeopathy

Tragedy

3  

Ayush Homeopathy

Tragedy

ये रे मना

ये रे मना

1 min
163

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना


गेला का तु असा निघुनी

काय झाला गुन्हा माझ्या हातुनी

ह्रदयाचा गाभा झाला रिकामा

जिवाचा माझ्या झाला घोटाळा

तुझ्याविना चित्त ही रमेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना


तुच आहे या देहाचा वाली

त्या पहाट प्रहरी, त्या भयाण रात्री

तुझ्याविना सुख रे कसले

तुझ्याविना दुःख ही रुसले

तुच आहे कल्पनेचे मुळ

शब्द ही माझे तुझ्याच साठी

तुझ्याविना काव्य ही सुचेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना


करुनिया थकलो तुझीच पुजा

तुझच ऐकलं, तसंच वागलो

देह हा माझा तुझ्याचसाठी

तुझ्याविना जीवन रे कसले

घे तुझी जागा, दे मला सुख

तुझ्याविना आयुष्य कटेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना

ये रे मना, माझ्या मना

तुझ्याविना करमेना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy