STORYMIRROR

Ayush Homeopathy

Inspirational

3  

Ayush Homeopathy

Inspirational

रामाचा दरबार

रामाचा दरबार

1 min
11

तरला सत्याचा विश्वास

हरला द्रुष्टांचा तो काळ

आज किती तपांनी हो

भरला‌ रामाचा दरबार

भरला रामाचा दरबार


कैक आले, कैक गेले

या मातीवर ठासुन बसले

किती मंदिरे कोसळली

किती नेस्तनाबूत झाली


किती दुर्जन माकडं ही

निघाली नष्ट करण्या

अस्तित्व माझ्या रामाचे

ठाऊक नाही त्यांना

आहेत इथे खंबीर

मावळे हे शिवरायांचे


किती वंश गेले

या जुलमी‌ राजवटीचे

आम्हाला पोखरून उंदीर हे

घुसु पाहत होते

धर्म आमुचा, आमचीच माती

गुलाम आम्हा करूनी

हिंदुंना लुटु पाहत होते


पण आता तो दिवस उजाडला

रामाचा अन् सकल‌ हिंदु जनांचा

आमच्या राममंदिराची पुन्हा स्थापना होणार

आज किती तपांनी हो

भरला रामाचा दरबार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational