STORYMIRROR

Ayush Homeopathy

Romance

3  

Ayush Homeopathy

Romance

रंगात तुझ्या

रंगात तुझ्या

1 min
12

रंगात तुझ्या मी रंगणार नाही

डोळ्यात तुझ्या मी गुतंणार नाही

जरी सौंदर्यवती आहेस तू

सौंदर्याला तुझ्या मी भुलणार नाही


ओठांवर असेल जरी

मधुर रस तुझ्या

पिण्यास ते व्याकुळ

मी होणार नाही


शृंगार जरी केलास तु,

नटलीस जरी खास तु

बघण्यास तुला मी

उतावीळ होणार नाही


जरी असशील

राजकुमारी तु

पायांवर तुझ्या मी

कधी येणार नाही


कितीही कर अट्टाहास तु

कितीही टाक मायाजाल तु

जाळ्यात तुझ्या मी

कधी अडकणार नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance