भुक
भुक
अन्न असते पुर्ण ब्रम्ह
असते ते जीवनाम्रुत
कुणाची थाळी असते
साजुक तुपातली
तर कुणाची असते ती
पिठलं भाकरीची
कुणाची असते ती
एका मिनिटांची कमाई
तर कुणाची असते
दिवसभराची हमाली
कुणाची असते ती
कष्टाची मिळकत
तर कुणाची असते ती
धुर्तपणाची किम्मत
पंक्तीच्या पंक्ती उठती
अन्न वाया घालुनी
किती भुकेले खाल्ले असते
त्या उष्ट्या ताटातुनी
पार्ट्यांचा तर नाद खुळा तो
चिकन बिर्याणी अन् सुरमई
ना ना प्रकार अन् ना ना तह्रा
व्हिस्कीचा प्याला अन् घास तंगडीचा
बियरचा ग्लास अन् वास मच्छीचा
रिकामी ताटे कोठे दिसती
हात जोडूनि उभे ते असती
मागुनी थकती विनवुण थकती
पण वाट्याला येई फक्त भुक
भुक, भुक आणि भुक
