STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

नाती जन्मजन्मांतरीची

नाती जन्मजन्मांतरीची

1 min
206

अवघड प्रसवाच्या

वेदनांनी विव्हळूनी

माता जन्म देई बाळा

मुखी तेज उजळूनी


नाते ते सहोदराचे

रक्तानेच जोडलेले

सुखदुःख वाटलेले

आयुष्यास वाहिलेले


नाते परममित्राचे

घट्ट असे रक्ताहूनी

संकटात धावतसे

नातेवाईकाहूनही


नाते मोठ्या बहिणीचे

सौख्यप्रेम फुलविते

कष्ट त्याग सोसूनही

भावंडांना सुखविते


नाती ही जन्मांतरीची

येती विविध रुपांनी

भाग्यवान तेच जगी

बद्ध ह्या घट्ट नात्यांनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract