STORYMIRROR

Santosh Jadhav

Inspirational

2  

Santosh Jadhav

Inspirational

नाते

नाते

1 min
2.8K


नाती- गोती सांभाळायला 

असावी तोंडात साखर .

मिळून खावी सर्वांनी 

चतकोर चतकोर भाकर .

आतून असावं प्रेम 

वरवरचा नको दिखावा .

एकमेकांचा खंबीर आधार

सुख दुःखात व्हावा .

मी पणाचं वस्र 

घालू नये कधी .

मनात असावा सच्चेपणा 

राहाणी असावी साधी

व्यक्तीगणीक आदर ठेवावा 

भेदभावास नसावी जागा 

खाल्ल्या मिठास जागावं 

देऊ नये दगा .

नातं असावं झाडासारखं 

फांदी फांदी एकसंध .

अतुट अशा नात्याचे 

न तुटणारे बंध


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational