नाते विश्वासाचे !!
नाते विश्वासाचे !!
नात्यामध्ये जातो जेव्हा ,
विश्वासाला तडा ....
संपून जातो तेव्हा ,
प्रेमभाव मनातला !
धाग्याहून नाजूक असे ,
नात्याचे हे बंध ...
एकदा का तुटले ,
कसे व्हावे एकसंध ?
विखरून जाते मन ,
तुटलेल्या काचेसारखं...
जपलं तरी होतं मग ,
गाठी मारलेल्या धाग्यासारखं !
