STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

नाते मैत्रीचे...

नाते मैत्रीचे...

1 min
204

बालपणीचा काळ निरागस

मैत्रीच्या गट्टीतच जमला

भेदाभेद नसे जेथे कदापी

अशा सवंगड्यातच रमला

       सवंगड्यास घेऊनी

        रानोमाळी हिंडताना

        मन हरवले निरागस

       झाड, फुले वेचतांना

मस्तीचे मग चढते डोंगर

सहज हिंडलो अनवाणी

स्वप्नांच्या दुनियेतील सफारी

असो नदीचे खळखळ पाणी

     बैसूनी निवांत झाडाखाली

     एकमेकांशी गप्पा रंगे

     गरीबीची ना आम्हास चिंता

     मैत्रीच्या दुनियेतील राजा संगे

 मैत्री निरागस अशीच देवा

जीवनात या दरवळू दे रे

सुख-दुःखाला मैत्रीचा खांदा

मन मोकळे करण्या मिळू दे रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational