नाते हे मना मनाचे बंध अतूट नात्याचे
नाते हे मना मनाचे बंध अतूट नात्याचे
पीठ देई दळून खावया
काम असे जसे जात्याचे |
तद्वत नाते हे मना मनाचे
जसे बंध अतूट नात्याचे | |१| |
ठेवी जोडून एकमेकांना
भावबंध रेशमाचे धागे |
प्रेम जिव्हाळ्या संगे प्रसंगी
समर्पणही करावंच लागे | |२| |
नाते जोडण्यासाठी हवा स्नेह
शारीरिक आकर्षण ना कामाचे |
काळ्या धनापेक्षा समाधान जास्त
मोल होते का खऱ्या घामाचे?| |३| |
