STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

4  

Ashok Shivram Veer

Inspirational

नारी

नारी

1 min
270

तरुण असो की असो म्हातारी,

असायला हवी घरात एक तरी नारी. 

घ्या समजून नारीजातीचा हा सार,

साऱ्या घराचा असे तीच आधार.

अस्तित्व तुळशीचे जसे दारोदारी,

महत्त्व नारीचे तसेच घरोघरी.

मोठ्यांची सावली लहानांची माऊली,

लेकरांच्या भेटीविना जीवाची काहीली.

दिन असो की असो ती निशा,

वावराने तिच्या बहरती दाही दिशा.

नसे देवपण देवाविन देव्हाऱ्याला,

तसे ना घरपण नारीविन घराला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational